सध्या ज्यांच्या निलंबनावरून राजकारण सुरू आहे ते पोलीस निरीक्षक रमेश गोकाक सलग दुसऱ्यांदा बळीचा बकरा ठरले आहेत. कायम अस्वस्थ, इंजिनिअरिंग शिकून वाट चुकलेल्या या माणसाला कुठल्याही सावकाराचा आशीर्वाद असला तरी नशीब साथ देत नाही अशी परिस्थिती आहे. दरवेळी कुणाच्या तरी चुकीला जबाबदार धरले जाऊन कारवाईला सामोरे जाणाऱ्या या अधिकाऱ्याची स्थिती वाईट आहे.
कुद्रेमानी येथील मटका जुगार अड्ड्यावर घातलेली धाड दूरगामी परिणाम झाले असून सदर प्रकरण गृह मंत्र्यांच्या दरबारात पोहोचले आहे.या प्रकरणी निलंबित झालेले काकती येथील पोलीस निरीक्षक रमेश गोकाक हे बेळगाव मधून सलग दुसऱ्यांदा बळी चा बकरा बनले आहेत.
मार्केट पोलीस स्थानक हे बेळगाव शहरातील महत्वाचे पोलीस स्थानक. या ठिकाणी पोलीस निरीक्षक म्हणून गोकाक यांना नेमण्यात आले होते. दंगली वाढत गेल्या गोकाक यांना डोकीत दगड बसला आणि तत्कालीन आमदारांनी त्यांना आपले वजन वापरून निलंबित करायला लावले होते. तेंव्हा गोकाक यांना सहानभूती मिळाली होती.
आत्ता काकती निरीक्षक म्हणून काम करण्याचा त्यांचा अनुभव घातक ठरलाय. तसे गोकाक हे देखील कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत मात्र त्यांना पुन्हा निलंबित व्हायला लागले. लेडी सिंघम सीमा लाटकर यांनी धाड टाकली आणि तो क्लब बंद पडला तेंव्हा आपले लाखो बुडाले हे कळलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्याने त्यांना निलंबित केले आहे.आता सावकार गोकाक यांचे काय करतात ते बघावे लागेल.