बेळगाव शहराच्या नवीन पोलीस आयुक्त कार्यालयाच्या नवीन इमारतीची प्रतीक्षा संपली असून आर टी ओ कार्यालया समोरील पोलीस खात्याच्या जिमखाना बिल्डिंग मध्येच नवीन आयुक्त कार्यालय स्थापित करण्यात येणार आहे.
बुधवारी सकाळी ग्रीवनसेस आणि मानव हक्क ए डी जी पी एन शिव कुमार हे बेळगाव दौऱ्यावर आले होते त्यावेळी या आर टी ओ समोरील जिमखाना इमारतीला भेट देऊन पाहणी केली.
2014 मध्ये पोलीस आयुक्त कार्यालय स्थापन केल्या पासून जुन्या एस पी ऑफिस मध्ये तात्पुरता पोलीस आयुक्त कार्यालय चालू करण्यात आले आहे.आता नवीन बिल्डिंग काम सुरू झाल्याने याच ठिकाणी आयुक्त कार्यालयातील सर्व विभाग कार्यालये एकत्र शिफ्ट होणार आहेत.
तत्कालीन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या काळात आयुक्त कार्यालय इमारतीसाठी 6.50 कोटी निधी मंजूर करण्यात आला होता त्या नुसार हे काम सुरू करण्यात आले आहे.