दी बेळगाव स्मार्ट सिटी लिमिटेड ने आता फळे आणि भाजी पासून तयार होणाऱ्या कचऱ्याची ऊर्जा बनवून तिचा बायोगॅस सारखा वापर करण्याचा प्रस्ताव पुढे आणला आहे. यासाठी सल्लागार संस्थेची निवड करण्यात आली आहे.
बेळगाव शहरात भाजी आणि फळांपासून तयार होणाऱ्या कचऱ्याचे पुढे काहीच होत नाही. न वापरले जाणाऱ्या या सेंद्रिय कचऱ्यातून स्वच्छ आणि पुनरुत्पादन करण्यासारखी ऊर्जा बनवता येते.
दररोज शहरात भाजी व फळांचा ३५ टन कचरा तयार होतोय. याचे ऊर्जेत रूपांतरण करण्यासाठी किमान २ एकर जमीन लागणार आहे. उद्यमबाग जवळ अशी एक जागा निश्चित करण्यात आली आहे.
हा प्रकल्प सत्यात आला तर शहराला दुसऱ्या कुठल्याच इंधनाची गरज लागणार नाही असे तरी स्मार्ट सिटी प्रकल्पाला वाटत आहे.