वूमन ईन एव्हीएशन इंटरनॅशनल च्या भारतीय शाखेतर्फे आज बेळगाव विमानतळावर गर्ल्स इन एव्हीएशन डे साजरा करण्यात आला. मुलींना हवाई वाहतूक क्षेत्रातील करियर च्या संधींची माहिती करून देणे हा उद्देश यामागे होता. भारत सरकारच्या स्किल इंडिया उपक्रमांतर्गत हा डे संलग्न होता.
शहर आणि भागातील विविध शाळांच्या ३५ विद्यार्थिनींना विमानतळावर आमंत्रित करण्यात आले होते. त्यांना विमानतळाची, तेथील कामकाज आणि नोकरीच्या संधींची माहिती देण्यात आली.
सर्व कामकाज दाखवून एअर ट्राफिक कंट्रोल इमारत, ऐरसिड, टर्मिनल बिल्डिंग याची सुद्धा माहिती देण्यात आली.
वूमन इन एव्हीएशन च्या अध्यक्ष राधा भाटिया यांनी माहिती दिली.सलग तिसऱ्या वर्षी असा उपक्रम राबवत आहोत. बेळगावमध्ये तो राबवताना आनंद होतोय. संपूर्ण जगात भारतीय मुली या क्षेत्रात अधिक आहेत. सर्वाधिक महिला पायलट भारतात आहेत. कर्नाटकातील मुली जास्ती संख्येने या क्षेत्रात यावात हा आमचा उद्देश आहे. अशी माहिती त्यांनी दिली.
हा उपक्रम कायम चालूच ठेवणार आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरणाशी याबाबत हातमिळवणी झाली आहे. असेही त्यांनी सांगितले.
विमानतळ पाहून झाल्यावर विद्यार्थिनींना प्रेझेन्टेशन च्या माध्यमातून हवाई वाहतूक व्यवसायाची माहिती देण्यात आली.तसेच अमेड्स इंडिया तर्फे वरिष्ठ व्यवस्थापक सुजाता मारीवला यांनी प्रश्न मंजुषा घेतली. विमानतळ संचालक राजेशकुमार मौर्य यांच्याशी बोलण्याची संधीही या मुलींना देण्यात आली.