‘जास्त मिजासकी नको’ हे पालकमंत्र्यांचे वक्तव्य मनाला बोचलय.असे म्हणत त्यांची भाषा आणि संस्कृती जनतेला पहिला पासून ठाऊक आहे ते प्रत्येक टप्प्याला विरोध करत आहेत असा अप्रत्यक्षरीत्या टोला ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर त्यांनी जारकिहोळी बंधूना लगावला आहे.
पी एल डी बँकेच्या निवडणुकीवरून सध्या बेळगाव काँग्रेस मध्ये सरळ सरळ दोन गट पडले असून दिवसेंदिवस दोन्ही बाजूनी एकमेकां विरोधात प्रतिक्रिया येतच आहेत. पत्रकारांनी काल रमेश जारकीहोळी यांनी केलेल्या बोचऱ्या टिके बद्दल विचारले असता त्यांनी वरील प्रतिक्रिया दिली आहे.
पी एल डी निवडणूक आता हाय कमांड कडे गेली असून पक्ष अध्यक्ष आणि इतर नेत्यांनी याबाबत फोन करून माहिती घेतली आहे आता याबाबत पक्षांतर्गत चर्चा होणार असे त्यांनी स्पष्ट केले आहे.
निवडणुका होऊन केवळ तीन महिने झाले आहेत तीन महिन्यांत किती त्रास द्यायचा तेवढा त्रास देत आहेत जातीचे राजकारण मी केलेलं नाही असा निर्वाळा देत मी जारकिहोळी बंधूंचा द्वेष करत नसून त्यांचा आदर करते असेही म्हटले आहे.
जारकिहोळी विरुद्ध हेब्बाळकर असा संघर्ष नसून मंत्री पदाच्या शर्यतीत माझं नाव जास्त चर्चेत आल्याने रमेश जारकीहोळी यांना राग आला असेल. जनता मला रोल मॉडेल म्हणून माझ्या कडे बघत असून आमची संस्कृती इतिहास निर्माण करणारी आहे राजकारणात कोणीही कायमचे मित्र किंवा शत्रू नसतात असेही त्यांनी म्हटले आहे.