मटका जुगार अड्डा प्रकरणी आठ ते दहा अधिकाऱ्याचा हात आहे. काही वरिष्ठ अधिकारी स्वतःला वाचवण्यासाठी काकती सिपीआयचा बळी देत आहेत. ही घटना गंभीर असून फक्त एकट्यालाच का कारवाईचा सामना करावा लागतोय? बाकीच्यांच्या अपराधावर पांघरूण का घातले जात आहे.?असा प्रश्न माजी मंत्री व आमदार सतीश जारकीहोळी यांनी उपस्थित केलाय. हे प्रकरण आपण गृहमंत्र्यांच्या निदर्शनास आणून देणार आहे असे त्यांनी सांगितले.
कुद्रेमानी येथे जुगार आणि मटक्याचा क्लब सुरू होता तर तुम्हाला माहिती कशी कळली नाही असा ठपका ठेऊन काकती पोलीस स्थानकाचे सिपीआय रमेश गोकाक यांना पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी निलंबीत केले आहे. पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांनी ही धाड टाकली होती. त्यांनी धाड टाकेपर्यंत काही पोलीस अधिकारी पैसे खाऊन हा अड्डा चालवायला देत होते, आता फक्त गोकाक यांना निलंबीत करून पोलीस आयुक्तांनी काय साध्य केले असा प्रश्न निर्माण झाला आहे. यावर जारकीहोळी यांनी उघड प्रतिक्रिया दिली.
अधिकाऱ्यात मतभेद आहेत. धाड टाकलेले अधिकारी वेगळे आणि कारवाई करणारे वेगळे आहेत. धाड टाकणाऱ्यानी अजून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निलंबनाबद्दल रिपोर्ट केला नाही.
मात्र कारवाई करणाऱ्यांनी एकालाच दोषी पकडले आहे. हे योग्य नाही. आपण हे प्रकरण वर पर्यंत नेणार आहे. कारवाई करू नका असे आपले म्हणणे नाही पण सर्व दोषी अधिकाऱ्यांवर करा, एकालाच बळीचा बकरा करू नका अशी आपली सूचना आहे असे जारकीहोळी यांनी सांगितले.