पी एल डी बँकेच्या अध्यक्षपदाची का पुढे ढकलली असा आरोप करत आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रात्रीं पुकारलेल्या ठिय्या आंदोलनास अक्का विरुद्ध सावकार असे वळण लागले आहे.
रात्री बारा वाजण्याच्या सुमारास रिसालदार गल्ली येथील तहसीलदार कार्यालया समोर दोन वेगवेगळे गट कार्यरत होते.माजी मंत्री सतिश जारकीहोळी आणि हेब्बाळकर अश्या दोन्ही समर्थकांनी परस्पर विरोधी घोषणा दिल्या त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
सव्वा अकराच्या सुमारास ए डी बोधप्पा आणि ए सी कविता योगप्पन्नावर यांनी आंदोलन करणाऱ्या आमदार हेब्बाळकर यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न करत आंदोलन मागे घेण्याची विनंती केली दोन गट घोषणाबाजी करत असल्यानें पोलीस आयुक्तांनी बंदोबस्त वाढवला होता.शेवटी पोलिसांनी एका गटाची मनधरणी करून मध्यरात्री एक वाजता हे आंदोलन नाट्य संपुष्टात आले.
ए डी सी पी एल डी बँकेच्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीची तारीख लवकरच देऊ असे अश्वासन देताच आमदार आणि इतर संचालकांना पोलीस बंदोबस्तात घरा पर्यंत सोडण्यात आले.
लोकसभा निवडणूक काही महिन्यात असल्याने पुन्हा एकदा अक्का विरुद्ध सावकार हा संघर्ष या पी एल डी बँकेच्या निमित्ताने समोर आला आहे.मागील विधान सभे पूर्वी पालकमंत्री रमेश जारकीहोळी हे लक्ष्मी हेब्बाळकरांचा बाजूनी होते मात्र आजच्या घडीला सतीश आणि रमेश हे बंधू एकत्र आलेत अश्यात होणाऱ्या या संघर्षा मुळे काँग्रेसचे जिल्ह्यात अच्छे दिन यायची शक्यता कमी होणार आहे.