लेडी सिंघम डी सी पी सीमा लाटकर यांनी कुद्रेमानीत खुले आम सुरु असलेल्या जुगार अड्ड्याच्या उध्वस्त केल्या नंतर पोलीस विभागात देखील पोस्ट मोर्टम सुरू झाले आहे.
पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी काकतीचे पोलीस निरीक्षक रमेश गोकाक यांना निलंबित केले आहे.सोमवारी रात्री आयुक्तांनी पत्रकारांना ही माहिती दिली.
कुद्रेमानी गाव काकती पोलीस स्थांनकाच्या कार्य क्षेत्रात येते म्हणून कर्तव्य बजावण्यात कसूर केल्याच्या आरोपा वरून वरील कारवाई करण्यात आलेली असल्याचे देखील आयुक्तांनी म्हटले आहे.
केवळ पोलीस निरीक्षकावर कारवाई झाली म्हणजे शहरातील सर्व अवैध धंदे बंद होणार नाहीत कुद्रेमानी प्रकरणातील बड्या माश्यांचे काय होणार अशी चर्चा सध्या रंगताना दिसतेय.