बेळगाव तालुका पी एल डी बँकेच्या अध्यक्ष पदाची उद्या मंगळवारी होणारी पुढे का ढकलली असा सवाल करत जिल्हा प्रशासनाचा विरोध करत ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी रात्री तहसीलदार कार्यालया समोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.
आमदार लक्ष्मी यांच्या बरोबर तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे सदस्य बाबुराव पिंगट(काकती)महादेव पाटील (उचगाव)आणि परशराम पाटील(यळेबैल) आदी धरणे आंदोलनास बसले आहेत.सोमवारी रात्री रिसालदार गल्ली येथे आंदोलनास सुरुवात केली आहे.कोणतेही ठोस कारण नसताना मुद्दाम हुन पी एल डी बँकेचे अध्यक्ष पदाची निवडणूक पुढे ढकलली असा आरोप यावेळी करण्यात येत आहे.
एकूण 13 पैकी 9 पी एल डी बँकेचे सदस्य आपल्या सोबत असल्याचा दावा करत त्यांनी हे ठिय्या आंदोलन सुरू केलंय. तहसीलदार कार्यालय परिसराला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले असून महिला आमदारांच्या रात्रीच्या आंदोलनास वेगळं महत्व प्राप्त झालं आहे.तहसीलदारांच्या विरोधात आमदार समर्थकांनी घोषणाबाजी केली.डी सी पी सीमा लाटकर यांच्या उपस्थितीत बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
पी एल डी बँकेच्या अध्यक्ष पदासाठी हेब्बाळकर आणि समितीच्या काही नेत्यांनी युती केल्याचे समोर आले आहे.