कुद्रेमानी येथील जुगारी अड्ड्यावर छापा टाकून धडक कारवाईने आपली छाप टाकलेल्या लेडी सिंघम डीसीपी सीमा लाटकर यांचा नियती फौंडेशन च्या वतीनं सत्कार करण्यात आला.
कायदा व सुव्यवस्था(Law & Order) विभागाच्या डीसीपी सीमा लाटकर यांनी बुधवारी सायंकाळी कुद्रेमानी येथील मटका व जुगारी अड्डय़ावर छापा टाकला होता. या छाप्यात चाळीस जुगाऱयांना अटक करण्यात आली होती. त्यांच्याजवळून 4 लाख 28 हजार रुपये, 44 मोटारसायकली, पाच कार, तीस मोबाईल जप्त करण्यात आले होते त्यावेळी डीसीपी सीमा लाटकर यांचे कौतुक सर्वच थरातून करण्यात येत होते.
डी सी पी लाटकर यांच्या धडक कारवाईने शहरातील अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत या कारवाईने अनेक बेकायदेशीर धंद्यावर चाप बसला आहे म्हणून नियती फौंडेशनच्या वतीनं लाटकर यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी डॉक्टर सोनाली सरनोबत, डाॅ समीर सरनोबत माजी महापौर विजय मोरे, मोनाली शाह, अमित देसूरकर, संतोष ममदापुर, सुद्धा माणगावकर व आदी उपस्थित होते.
नियती फौंडेशन आत्महत्या रोखण्यासाठी प्रयत्न तसेच सामाजिक कार्य, विद्यार्थ्यांना व गरजूंना आर्थिक मदत या सारखे काम करते.