बेळगाव तालुक्यातील नंदीहळळी जवळ पोलिसांनी चार वाळूचे ट्रक ताब्यात घेतले आहेत. सीसीबीने ही कारवाई केल्याची माहिती मिळाली आहे मात्र अजूनही याबाबत एफआयआर दाखल करण्यात आलेली नाही.
नंदीहळळी येथे शनिवारी मध्यरात्रीच्या वेळी बेकायदा वाळू वाहतूक करण्यात येत होती याची माहिती सीसीबीला मिळालीपोलिसानी अचानक छापा टाकून ट्रक ताब्यात घेतले.
बेळगाव live ला मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी दरम्यान अचानक छापा टाकल्याने ट्रक चालक, वाहकात भीती निर्माण झाली होती. ट्रक अडविणारे पोलीसच आहे की नाहीत हे समजले नसल्याने त्यांना धक्काबुक्की झाल्याची माहिती मिळाली आहे त्यामुळे एकच गोंधळ उडाला पोलिसांना धक्काबुक्की झाल्यानंतर काही पोलीस आल्याने सीसीबीने चे पोलीस असल्याचे समजले या घटनेत पोलिस अधिकाऱ्यांनी चार ट्रक ताब्यात घेतले आहेत.
ताब्यात घेतलेले ट्रक बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात ठेवण्यात आले आहेत. शनिवारी ताब्यात घेतलेले बेकायदा वाळू वाहतुक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. मात्र अजूनही एफआयआर दाखल करण्यात आले नसल्याने संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.