बेळगाव विमानतळ आणि विमानतळ प्राधिकरणाने केरळ येथील पुरग्रस्थांसाठी दिलेल्या हाकेला प्रतिसाद देऊन नागरिक व संघटनांनी विमानतळावर तीन टन मदत जमा केली आहे. यापैकी १ टन साहित्य उद्या एअर इंडियाच्या विमानाने पाठवली जाणार असून गुरुवारी उर्वरित दोन तीन मदत पाठवून दिली जाणार आहे.
विमानतळाचे मुख्याधिकारी राजेशकुमार मौर्य यांनी जिल्हा प्रशासन तसेच लाखो मदतकर्त्या बेळगाव वासीयांचे आभार मानले आहेत.
सोमवारी पाठविल्या जाणाऱ्या साहित्यामध्ये सॅनिटरी नॅपकिन्स, ब्लॅंकेट्स, बिस्किट्स, वह्या या साहित्याचा समावेश असेल. एअर इंडिया कंपनीच्या स्टेशन मॅनेजर मंजुनाथ यांनी याकामी मोठी मदत केली आहे.
बेळगावमधून आवळे, भारत इंटरप्रायझेस, ह्युमनीटी फौंडेशन, बी के मॉडेल स्कुल, केआरआरएस रयत संघ, बी जे मूतगेकर, पॉल एवन्स, कीर्ती चौगुले, प्रभाकर इटापे, नितीन चिंगले, जोती कॉलेज, अपटेक एव्हीएशन, बबन भोबे, शिवलिंगेश्वर प्राथमिक शाळा, चंदू केंगेरी, प्रशांत जाधव, ज्योतिर्लिंग इंटरप्रायझेस, शिवराज जाधव, विश्वास जाधव, शांत चंदगडकर, श्री कोकितकर, करुणाकर शेट्टी, पार्थ चोत्तराय, तानाजी गावडे, आनंद हालासपरली, विशाल चौगुले, दि स्पॉट रेस्टॉरंट, तानाजी पाटील, व्ही एस कलमठ, लता काळे, कृष्णा राव जाधव, रेणुका स्वीट मार्ट, विनायक चांदगावकर, शुभम ताडे, अजिंक्य जाधव, जैन हेरिटेज स्कुल, वेंकटेश अरकसाली, भाऊराव काकतकर कॉलेज, शिरीष पाटील, गणेश सहकारी सोसायटी, वेंकटेश, ज्योती अनगोळकर, डॉ सुचित्रा लाटकर,सेंट मेरीज हायस्कुल, जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव सखी आणि मेन यांनी मदत केली आहे.
यापुढे कुणीही मदत आणून देऊ नये अशी विनंतीही करण्यात आली आहे.