Tuesday, November 19, 2024

/

‘टॉयलेट देऊन जिल्हा पंचायतीचे रक्षा बंधन’

 belgaum

बेळगाव जिल्ह्याच्या विविध ग्राम पंचायत योजने अंतर्गत आज रक्षा बंधनाचे औचित्य साधून जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रामचंद्रन आर यांनी जिल्हा पंचायत सदस्या असलेल्या असंख्य बहिणींना टॉयलेट भेट देण्याद्वारे रक्षा बंधनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला.

येत्या 2 ऑक्टोबर 2018 रोजी गांधी जयंतीच्या आत बेळगाव जिल्हा हा हागणदारी मुक्त करण्यासाठी जिल्हा पंचायतीने अनेक कार्यक्रम हाती घेतले असून त्यापैकी हा एक कार्यक्रम असल्याचे रामचंद्रन यांनी सांगितले.

Zp toilet

आजचा रक्षा बंधनाचा कार्यक्रम अर्थ पूर्ण रित्या साजरा करण्यासाठी जिल्हा पंचायत सदस्यांनी ग्राम पंचायत व्याप्तीतील महिलाना टॉयलेटांची भेट देऊन त्यांना प्रेरणा दिली.

आज संपूर्णबेळगाव जिल्ह्यात 2400 हुन अधिक शौचालये बांधून याचे काम युद्ध पातळीवर पूर्ण करण्यात असल्याने मला खूप समाधान वाटत असल्याचे देखील रामचंद्रन यांनी बोलताना स्पष्ट केले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.