आपल्या देशाचे रक्षण जसे आमचे जवान करतात तसेच आपल्या गावचे रक्षण हे आपले पोलीस बांधव करत असतात आणि ऊन, पाऊस थंडी वारा,सण समारंभ याची तमा न बाळगता काम करणारे बेळगावचे ट्रॅफिक पोलीस…
खरोखर ट्रॅफिक पोलिसांची कामगिरी महत्त्वाची आहे कारण बेळगाव शहरात हल्ली इतकी ट्रॅफिक वाढलेली आहे त्याचा सगळा ताण हा या पोलीस बांधवांच्यावर येतो अशा बंधूंच्या सोबत जायंटस् सखीने राखी पौर्णिमा साजरी केली.
उपस्थित सर्व पोलीस बंधूंना सखींनी पहिला कुंकूम तुळक लावून राखी बांधली त्यानंतर औक्षण करण्यात आले आणि जिलेबी वाटण्यात आली.
पोलीस स्टेशन म्हंटलं तर डोळ्यासमोर येतं ते एक गंभीर वातावरण पण आज एक प्रकारचे कौटुंबिक वातावरण त्या ठिकाणी पहावयास मिळाले यावेळी पोलिसांना याचे खूप कौतुक वाटले आणि त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद दिसत होता.
रक्षाबंधनाचा हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठीअध्यक्षा ज्योती अनगोळकर, उपाध्यक्षा नम्रता महागावकर, मनीषा कारेकर,सेक्रेटरी अपर्णा पाटील सविता मोरे रेणू भोसले दिपा मुतकेकर ,विद्या बांदिवाडेकर प्रियंका बांदिवाडेकर निता खंडोजी पुष्पा कोठारी वरदा आंगडी राजश्री हसबे ज्योती सांगुकर सुलक्षणा शिन्नोळकर भाग्यश्री पवार यांनी विशेष परिश्रम घेतले.