प्रदेश काँग्रेस अध्यक्ष दिनेश गुंडुराव यांच्या पत्रकार परिषदेत काँग्रेस नेत्यांत खुर्चीसाठी तू तू मै मै झाल्याचा प्रसंग पहावयास मिळाला.जिल्हा काँग्रेसचे महानगर अध्यक्ष राजू सेठ यांना पत्रकार परिषदेवेळी खुर्ची ठेवण्यात आली नव्हती त्यामुळे हा प्रसंग उदभवला.
आपल्या भावाला खुर्ची आरक्षित न केल्याने माजी आमदार फिरोज सेठ चांगलेच संतापले होते.जिल्हा काँग्रेस प्रभारी पी सी मोहन यांच्यावर सेठ चांगलेच भडकले आणि आपल्या भावाला खुर्ची मिळवून दिली.
महानगर अध्यक्ष असलेले राजू सेठ यांना पक्षाच्या प्रोटोकॉल नुसार समोर खुर्ची का दिली नाही या विषयी सेठ यांनी नाराजी व्यक्त करताच खुर्चीची पर्यायी व्यवस्था करण्यात आली. राजकारणात सगळं काही खुर्चीसाठीच होतं असतं मागील विधान सभेत सेठ यांचा पराभव झाल्यानेच आपल्या भावाला प्रोटोकॉल नुसार मिळणारी खुर्ची मिळवून देण्यासाठी फिरोज सेठ यांना जोरदार प्रयत्न करावे लागले.