चिकोडी राखणे तर बेळगावचा गेलेला गड परत मिळवणे हे आगामी लोकसभा निवडणुकीतील काँग्रेसचे लक्ष असेल त्यासाठी रणनीती आखली जात आहे असे वक्तव्य कर्नाटक प्रदेश काँग्रेस अध्यक्ष दिनेश गुंडुराव यांनी केले आहे.
रविवारी ते बेळगाव दौऱ्यावर आले असता आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.गेल्या चार वर्षात केंद्राकडून राज्यातील जनतेला न्याय मिळवून देण्यात अपयश आले आहे मात्र आता राज्यात सत्ता मिळवण्यासाठी आंदोलन करत आहेत. जनतेची दिशाभूल करणेच भाजपचा मुख्य अजेंडा असून चार वर्षातल मोदींचे देशाला दिलेलं देणं काय असा सवाल देखील केला आहे.
उत्तर कर्नाटकला संधी
आमच्या आमदारांना पैसे आणि पदांची लालच भाजप नेते दाखवत आहेतआणि संमिश्र सरकार पडेल अशी वक्तव्ये भाजप नेते करीत आहेत असे म्हणत त्यांनी संमिश्र सरकार मध्ये बारीक सारीक मतभेद असू शकतात पुढील मंत्री मंडळ विस्तारात उत्तर कर्नाटकातील आमदाराना अधिक संधी दिली जाईल असे देखील त्यांनी स्पष्ट केलं.
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी निर्णयात काँग्रेसला विश्वासात घेऊनच निर्णय घेतला आहे संमिश्र सरकार आहे म्हणजे दोघांचा निर्णय आहे असे ते म्हणाले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काँग्रेस सगळीकडे निवडणूक लढवत असून जास्त जागा निवडून येतील असा आमचा अंदाज आहे.विधान सभेत विकास नाही म्हणून कमी जागा आल्या नसून त्या पराभवास वेगळं कारण आहे असं ही त्यांनी नमूद केलं.