सर्वधर्मसमभाव, सामाजिक सलोखा, कर्तव्यदक्षता, गुन्हेगारांना धडकी आणि इतर अनेक कारणांनी सिंघम ठरलेल्या एपीएमसी पोलीस स्थानकाचे निरीक्षक जे एम कालीमिरची यांना सीएम मेडल बहाल केले जाणार आहे.
त्यांचे एकूण कार्य लक्षात घेऊन त्यांना हे मेडल देण्यात येणार आहे. बंगळूर येथे होणाऱ्या शानदार समारोहात हे पदक दिले जाईल.
कालिमिरची यांनी आपल्या कार्याचा ठसा संपूर्ण राज्यात उमटवला आहे. लोकप्रिय पोलीस अधिकारी म्हणून ते परिचित आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन सर्व पोलीस स्थानकांनी काम करावे असे आवाहन मध्यतरी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि स्वतः गृहमंत्र्यांनी सुद्धा केले होते.
डी सी आय बी चे रमेश हुगार यांना देखील मुख्यमंत्री पदक जाहीर झाले आहे