भारत रत्न माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या अस्थी कलशाचे दर्शन हजारो लोकांनी घेतले.शनिवारी बेळगाव भाजपच्या वतीनं वाजपेयींच्या अस्थींची शहरातील विविध मार्गावर मिरवणूक काढली होती.भाजपच्या वतीनं अस्थींचे पूजन करून मिरवणूक काढण्यात आली.
कित्तुर चनम्मा चौकातून काकती वेस गणपत गल्ली, अर्बन बँक शनी मंदिर कपीलेश्वर उड्डाण पूल,एस पी एम रोड, खडे बाजार शहापूर,नाथ पै चौक,खासबाग,बी एस येडियुरप्पा रोड हुन बागेवाडी कडे रवाना झाल्या.
खासदार सुरेश अंगडी,आमदार महांतेश कवटगीमठ, शंकर गौडा पाटील किरण जाधव दिपक जमखंडी आदींनी दर्शन घेतलं तर विशेष म्हणजे कर्नाटक प्रदेश महिला अध्यक्ष ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर, माजी नगरसेवक बाळासाहेब काकतकर यांनीही अस्थी कलशाचे दर्शन घेतलं.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे भाजपचं सर्वमान्य नेतृत्व होत हे यातून पुन्हा एकदा अधोरेखित झालं आहे.वाजपेयींच्या अस्थी बेळगाव जिल्ह्यातील अनेक ठिकाणी जनतेला दर्शनासाठी फिरवून नदीत विसर्जित केला जाणार आहे.