मुतगे (बेळगाव )ची कन्या पुजा पुंडलिक पाटील हिची सीमा सुरक्षा दलात निवड झाली असून कर्नाटक राज्यातून निवड झालेली ती एकमेव मुलगी आहे.ही बाब आम्हा बेळगाव मधील भगिनींची मान उंचावणारी आहे युवा पिढी साठी ती प्रेरणा स्थान ठरेल असे उदगार जायंट्स सखीच्या अध्यक्षा ज्योती अनगोळकर यांनी काढले.
अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असताना लष्करात किंवा पोलीस दलात जाण्याचे स्वप्न पुजा ने लहानपणापासूनच पाहिले होते. तिच्या शिक्षकांनी सुरवाती पासूनच तिला प्रोत्साहन दिले होते. शिक्षकांची प्रेरणा घरच्या ची साथ आणि तिच्या जिद्द आणि चिकाटी च्या जोरावर ती सीमा सुरक्षा दलात निवडली गेली.तिच्या या यश मध्ये तिचा भाऊ महेश हा पहिल्या पासूनच खंबीरपणे तिच्या पाठीशी उभा होता.
1 संप्टेबंर पासून तिचे 19 बटालियन ठाकुरगंज नेपाळ सीमेवर येथे प्रशिक्षण सुरु होणार असून अभिमानाची गोष्ट म्हणजे ती 15 ऑगस्ट रोजी रुजू झाली आहे.अशा या बेळगाव च्या कन्येला जायंट्स सखी या महिलांच्या सेवा भावी संघटनेने तिला शाल स्मृती चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देण्यात आल्या .
या वेळी बोलताना पुजा पाटील हिने शालेय जीवना पासूनच लष्करी वर्दीचे वेड मला लागले होते ते मी पुर्ण केले असून या पुढील काळात मी देशसेवेसाठी पडेल ते काम करणार असल्याचे सांगितले व सत्कारा बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
या प्रसंगी उपाध्यक्षा नम्रता महागांवकर मनिषा कारेकर सविता मोरे रेणू भोसले वरदा आंगडी भाग्यश्री पवार पुजा चे आई वडील भाऊ आणि बाकी सदस्य उपस्थित होते.सुत्रसंचालन आणि आभार सेक्रेटरी अपर्णा पाटील यांनी केले.