काँग्रेस पक्षाला संपूर्ण बहुमत मिळाले असते तर सिद्धरामय्या नक्कीच मुख्यमंत्री बनले असते मात्र राज्यातील जनतेने काँग्रेसला बहुमत दिल नाही.पुढे काँग्रेस सत्तेत आलं तरी कोण मुख्यमंत्री ते हाय कमांड ठरवेल असं वक्तव्य माजी मंत्री सतीश जारकीहोळी यांनी केलंय.
स्मार्ट सिटी बैठकीत सहभागी व्हायला ते बेळगावात आले असता त्यांनी पत्रकारांशी बोलत होते. सिद्धरामय्या यांनी मी पुन्हा मुख्यमंत्री होईन वक्तव्यावर जारकीहोळी यांनी बेळगावातून प्रतिक्रिया दिली आहे. संमिश्र सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करेल सिद्धरामय्या यांनी आपलं वयक्तिक मत मांडले आहे.कुणीही काहीही म्हटलं तरी शेवटी निर्णय हाय कमांडचाच असतो असे ते म्हणाले.
भूतरामहट्टी होणार राज्यातील दुसरं मोठं प्राणीसंग्रहालय-जारकिहोळी
मैसूर नंतर बेळगाव जवळील भूतरामहट्टी येथे राज्यातील मोठं प्राणीसंग्रहालय म्हणून त्याचा विकास केला जात आहे ते दुसरं मोठं प्राणी संग्रहालय होईल असा दावा माजी मंत्री आणि यमकनमर्डीचे आमदार सतीश जारकीहोळी यांनी केला आहे.
भूतरामहट्टी प्राणी संग्रहालय कंपाऊंड निर्माण करण्यासाठी दोन कोटी रुपये देण्यात आले असून आणखी तीन कोटी लवकरच देण्यात येणार आहेत आणखी निधी लागल्यास लवकरच निधी दिला जाईल असे ते म्हणाले. याशिवाय केंद्र सरकारच्या वन्य जीवी निगम मंडळा कडून राज्य वन खात्याने चर्चा करून पत्रव्यवहार केलेला आहे एकूणच भूतरामहट्टी हे राज्यातील दुसरं मोठं प्राणी संग्रहालय बनेल असे सतीश म्हणाले.