belgaum

शासनाने सणाच्या तोंडावर विघ्ने आणू नये:संभाजी पाटील

0
432
Maha mandal meeting
 belgaum

प्रशासनाने सध्या परिस्थितीत पी ओ पी गणेश मुर्तीं बंदी बाबत निर्णय शिथिल करावा कारण पी ओ पी बंदी बाबत जनजागृती करून टप्प्या टप्याने गोष्टी अमलात आणल्या जातील एकदम निर्णय घेता येणार नाही अशी भूमिका मध्यवर्ती मंडळाच्या बैठकीत माजी आमदार संभाजी पाटील यांनी मांडली.
माजी आमदार आणि मध्यवर्ती गणेश महा मंडळाचे अध्यक्ष संभाजी पाटील यांनी कॅम्प येथील कार्यालयात महत्वपूर्ण बैठक घेतली यावेळी उपमहापौर मधूश्री पुजारी,कार्याध्यक्ष रमाकांत कोंडूसकर, विकास कलघटगी, मदन बामणे, रणजित चव्हाण पाटील आदी उपस्थित होते.सध्या पी ओ पी मूर्ती तयार आहेत त्यामुळे शासनाने सणाच्या तोंडावर विघ्न आणू नये असे आवाहन देखील संभाजी पाटील यांनी केलं.

Maha mandal meeting

प्रशासकीय बैठक त्वरित घ्या:मध्यवर्ती गणेश महा मंडळ

 belgaum

गणेश उत्सवाच्या आगमनाला जेमतेम 18 दिवस शिल्लक असताना प्रशासनाने तातडीने प्रशासकीय बैठक घेऊन प्रलंबित कामे मार्गी लावावी पूर्व तयारीची कामे करा अशी मागणी मध्यवर्ती गणेश उत्सव महा मंडळाच्या वतीने करण्यात आली.शुक्रवारी सकाळी महापौरांची भेट घेऊन ही मागणी करण्यात आली.
पालिकेच्या वतीनं पी ओ पी गणेश मूर्तींची पहाणी करण्यात येत आहे त्या पाश्वभूमीवर महा मंडळाने महापौरांची भेट घेतली आहे.गणेश उत्सव जवळ आला असताना पालिकेच्या वतीनं पी ओ पी गणेश मूर्ती पहाणी योग्य नसून सर्व मूर्ती आलेल्या आहेत त्यामुळं मूर्तिकाराना त्रास करून वातावरण कलुषित करू नका असा देखील सल्ला देण्यात आला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.