Sunday, November 17, 2024

/

कचरा व्यवस्थापन शुल्क आणि दंडात वाढ

 belgaum

कचऱ्याची उचल करण्यासाठी मनपा कढून घेतल्या जाणाऱ्या शुल्कात वाढ करण्यात आली आहे. कचरा जमा करण्याच्या बाबतीत नियमभंग करणाऱ्यांना बसविल्या जाणाऱ्या दंडातही वाढ करण्यात आली आहे.
*असा असेल सुधारित दंड*
१. रस्त्यावर कचरा फेकणे:१५०० रुपये
२.ओला व सुका कचरा वेगळा न करणे:५००० रुपये
३.हॉटेल व मोठ्या संस्थांनी कचरा साठवून ठेवल्यास: १५००० रुपये
४: रस्त्यावर बांधकाम साहित्य ठेवणे:२५००० रुपये

kachara

मिळकत कराबरोबर दरमहा कचरा कर म्हणून स्वीकारला जातो तो आता दरमहा ४० रुपये याप्रमाणे आकारला जाईल.
त्यामध्ये
*५० चौ मीटरच्या बांधकामासाठी दरमहा ४० रुपये
*३०० चौ मीटरच्या बांधकामासाठी दरमहा १६० रुपये
*२०० चौ मीटरच्या व्यावसायिक इमारतीसाठी दरमहा ४०० रुपये
*३०० चौ मीटरच्या हॉटेलसाठी दरमहा ३००० रुपये
* हॉस्टेल व वसतिगृहासाठी दरमहा १५००
*५० आसन क्षमतेच्या हॉटेलसाठी दरमहा १५०० रुपये
असा दर समाविष्ट आहे.

नगर विकास मंत्रालयाने एक आदेश मनपाला काढला असून कर्नाटक मनपा कचरा व्यवस्थापन कायद्याची योग्य अंमलबजावणी करण्याची सूचना केली आहे.
एक संघटना किंवा संस्थेने १०० पेक्षा अधिक लोकांना एकत्र जमवायचं असल्यास स्वतंत्र अर्ज करून मनपाला तीन दिवस आधी कळवले पाहिजे. जमणाऱ्या कचऱ्याची २४ तासाच्या आत विल्हेवाट करण्याची हमी दिली पाहिजे असेही सुधारित नियमात म्हटले आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.