शहापूर सह दक्षिण बेळगावातील विविध रस्त्यांची दुरावस्था झालेली आहे अश्यात गणेश उत्सवाच्या आता खड्डे बुझवा आणि कपिलेश्वर,जक्कीन होंड,जुने बेळगाव वडगाव आणि इतर ठिकाणचे कृत्रिम तलाव स्वच्छ करा अशी मागणी शहापूर विभाग गणेश उत्सव महा मंडळाने केली आहे.
शुक्रवारी दुपारी महापौर बसप्पा चिखलदिनी आणि उपमहापौर मधूश्री पुजारी यांची भेट घेऊन त्यांनी निवेदना द्वारे ही मागणी केली आहे.
13 सप्टेंबर पूर्वी गणेश उत्सवाची सुरुवात होत आहे त्या अगोदर खड्डे बुझवा या शिवाय बंद पडलेले रस्त्यावरील दिवे आणि हायमास्ट दुरुस्त करा,मिरवणूक मार्गावरील झाडांच्या फांद्या वायर असे अडथळे दूर करा,मंडळांना परवानगी साठी शहापुर सह दक्षिण भागासाठी वेगळी सिंगल विंडो सुरू करा,सर्व विसर्जन तलाव स्वच्छ करा अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
बेळगावच्या गणेश उत्सवातील देखावे पहाण्यासाठी परगावाहून येणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे यात महिला आणि युवकांची संख्या अधिक असते गणेश भक्तांना तात्पुरता मुताऱ्यांची सोय केली जावी हिंदवाडी सर्वोदय कॉलनी या भागात नवीन कृत्रिम विसर्जन तलाव निर्माण करा आणि गणेश मंडळांना आर्थिक मदत देण्याचे दिलेले आश्वासन पूर्ण करा अशी मागणी आम्ही केली असल्याची माहिती गणेश महा मंडळाचे नेताजी जाधव यांनी दिली.यावेळी महापौर बसप्पा चिखलदिनी यांनी शहरातील रस्त्यांचे खड्डे बुझवण्यासाठी 38 लाखांचा निधी मंजूर झाले असून लवकरच काम सुरू करू असे आश्वासन शिष्टमंडळाला दिले.
यावेळी शहापूर भागातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.