केरळ मधील पूरग्रस्तांना मदतीसाठी राष्ट्रीय भाजप किसान मोर्चाने नियुक्त केलेल्या समितीच्या अध्यक्षपदी किसान मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष शंकर गौडा पाटील यांची निवड करण्यात आली आहे. राष्ट्रीय किसान मोर्चा अध्यक्ष वीरेंद्र सिंह मस्त यांनी अध्यक्ष आणि सदस्यांसह समितीची निवड केली आहे.
सदर भाजपच्या समितीला पूरग्रस्त केरळ राज्याचा दौरा करून केरळ मधील शेतकऱ्यांना किती नुकसान झालं आहे याचा अहवाल एका आठवड्याच्या आत द्या अश्या सूचना दिल्या आहेत.केरळ आणि कोडगू येथील पूरग्रस्त भागाचा दौरा करताना संभाव्य गरजू वस्तूंची मदत करा असा देखील आदेश दक्षिण भारतातील भाजप किसान मोर्चा संघटनांना दिला आहे.
आगामी 26 आगष्ट पासून आम्ही बंगळुरुतुन आम्ही मदत सामुग्री घेऊन केरळला जाणार आहोत भाजप राष्ट्रीय किसान मोर्चाची टीम सोबत असणार एका आठवड्याच्या केरळ दौऱ्यात शेतकऱ्यांना लोकांना किती नुकसान झालंय याची पाहणी करून अहवाल तयार करणार आहे.राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, किसान मोर्चा अध्यक्ष वीरेंद्र सिंह मस्त आणि रामलाल यांना सोपवणार आहोत त्या नंतर केरळ साठी ऍक्शन प्लॅन तयार होईल अशी माहिती शंकर गौडा पाटील यांनी बेळगाव live कडे बोलताना दिली.
केरळ पूरग्रस्त भागाचा दौरा समितीत
शंकर गौड़ा पाटिल(राष्ट्रीय किसान मोर्चा उपाध्यक्ष ) हे संयोजक अध्यक्ष,डॉ शंभू कुमार (राष्ट्रीय सचिव)सह-संयोजक,मोहन मस्त (मास्टर राष्ट्रीय सचिव)सदस्य , सुधीर त्यागी(राष्ट्रीय कोषाध्यक्ष किसान मोर्चा-)सदस्य,टी सत्य कृष्णा राजू (प्रभारी केरला)सदस्य,रविचंद्रन (प्रभारी पांडिचेरी)-सदस्य,राजन (राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य)सदस्य ,मधुसूदन रेड्डी(अध्यक्ष तेलंगाना )सदस्य म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे.