दारू पिऊन नशेत डंपर चालवणाऱ्या चालकास रिक्षा चालकांनी चांगलाच चोप दिल्याची घटना मंगळवारी सायंकाळी फोर्ट रोड भरतेश शाळेजवळ घडली आहे.
डंपरने मागून वर्दीच्या रिक्षास धडक दिल्याने ऑटो मधील दोन विद्यार्थी किरकोळ जखमी झाले होते अन सुदैवाने मोठा अपघात टळला होता.दारूच्या नशेत चालकाने मागे न पाहता ब्रेक सोडला त्यामुळं ऑटो रिक्षाला डंपर मागून आदळला.
या घटनेत दैव बलवत्तर म्हणून मोठी हानी झाली नाही याची कल्पना येताच गर्दीच्या ऑटो चालकांनी नशेत असलेल्या चालकाची धुलाई केली यावेळी बराच गोंधळ उडाला होता.