आशियाई चॅम्पियन बजरंग पुनियाने येळ्ळूरच्या महाराष्ट्र मैदाना मध्येही खेळली होती कुस्ती..नुकतीच झालेल्या आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारा बजरंग पुनिया याने सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. त्याच्या या यशाबद्दल सर्वत्रच अभिनंदन होत आहे.
दरम्यान याच बजरंग पुनियाने येळ्ळूरच्या महाराष्ट्र मैदानातही काही वर्षापूर्वी कुस्ती खेळली होती. त्यामुळे येळ्ळूर येथे कुस्ती संघटनेने बैठक घेऊन पुनियाचे अभिनंदन केले आहे.
त्याचे हे यश देशात आणखी एक मानाचा तुरा रोवल्याच्या प्रतिक्रिया यावेळी बैठकीत व्यक्त करण्यात आल्या. त्याने स्पर्धेत ज्या प्रकारे विरोधकांवर मात केली आहे त्यावरून तो सगळीकडे प्रसिद्ध झाला आहे. य येळ्ळूर येथे झालेल्या कुस्तीतच त्याने आपली प्रतिभा दाखवली होती. त्यामुळे पुनियाच्या अंगाला येळ्ळूरच्या आखाड्याचे माती लागली असल्याने त्याची भरारी होत असल्याच्या प्रतिक्रिया बैठकीत व्यक्त झाल्या.
या बैठकीत पुनियाने खेळलेल्या कुस्तीची माहितीही या बैठकीत देण्यात आली. यावेळी मारुती कुगजी याच्यासह इतर मान्यवर मंडळी उपस्थित होते. बजरंग सह सुशीलकुमार आणि देशातील अनेक नामवंत मल्लांनी येळ्ळूरच्या महाराष्ट्र मैदानात कुस्ती खेळली आहे.