वाघवडे येथे पैशासाठी एका तरुण मुलाचे अपहरण झाले होते. मात्र गावकऱ्यांनी त्या युवकाची सुटका करून घेतली आहे. ग्रामस्थांनी पकडलेल्या अपहरण करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे पण अजून गुन्हा दाखल झालेला नाही.
वाघवडे येथील दोन व रणकुंडये येथील दोन मुलांनी एक शिक्षकाच्या मुलाचे अपहरण केले होते. शुभम शंकर बेळगावकर (वय १८) असे अपहरण झालेल्या मुलाचे नाव आहे. तो काल रात्री दूध आणण्यासाठी घरातून बाहेर गेला होता. वाघवडे येथील त्या दोघांनी गाडीतील पेट्रोल संपलय असा बहाणा करून शुभमला शेतावर नेले. त्या शेतावर इतर दोघे होते. त्यांनी हातात दोन चाकु आणि तलवारी आणल्या होत्या.
शुभमला भीती दाखवून दोरीने बांधले व रात्रभर उसाच्या मळ्यात टाकण्यात आले होते.
आज सकाळी त्याच्यासोबत दोघे राहून बाकीचे अंदाज घेण्यासाठी गावात फिरत होते. शुभम चा शोध सुरू असताना त्या तरुणांवर संशय आला,गावच्या मुलांनी विचारले असता संशय बळावला त्यांना मारण्यात आल्यावर सगळा प्रकार उघड झाला. गावच्या मुलांनी त्यांना शेतावर नेऊन त्याची सुटका केली आहे.
दुपारी एक वाजता ग्रामीण पोलिसांना कळवून बसू नाईक व
रणकुंडये येथील एकास त्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे.संतोष(रा. वाघवडे)
सह दोघे फरार झाले आहेत. आम्ही तुझ्या वडिलांकडून पैसे मागणार आहे, आमची नावे सांगू नकोस बेळगावच्या मुलांनी पळवले असे सांग अशी धमकीही शुभम याला देण्यात आली होती.
आता पोलिसांनी गुन्हा नोंदवून घेऊन कठोर कारवाई करावी लागणार आहे. तक्रार आली नाही असे सांगून हात वर केले जात आहेत तेंव्हा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे.