स्वतः संकटात असून देखील इतरांच्या मदतीसाठी धावून जाण्याचे काम बेळगावातील शेतकरी संघटनेने केलं आहे.गेली चार वर्षे पडत असलेला दुष्काळ दुसरीकडे कर्जाचा बोजा अश्या स्वतःवर संकट असताना देखील बेळगावच्या शेतकऱ्यांनी दुसऱ्याला मदत दिली आहे.
बेळगावच्या जिल्हाधिकारी कार्यालया समोर रयत संघटनेच्या विविध संघटनांनी शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज माफी साठी मंडप उभारून आंदोलन करत आहेत मात्र याच मंडपातून त्यांनी केरळ आणि कोडगू मधल्या पूर ग्रस्ता साठी मदत सामुग्री गोळा करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
या शेतकऱ्यांनी आपल्या घरातुन कडक भाकऱ्या,चपात्या,लसूण शेंगा चटणी या शिवाय ब्रेड आणि बिस्किटे,तांदूळ आणि जीवनोपयोगी वस्तू जमवून कोडगू आणि केरळाला पाठवली.शेतकरी मदतीचा हात देत असताना इतरांनी ही या कामी पुढाकार घ्यायला हवा.