इंग्लिश मीडियम कडे शिक्षणाचा कल वाढत असताना गावातील मराठी माध्यमात विद्यार्थी संख्या वाढावी यासाठी शाळेचे माजी विद्यार्थी पुढे आले आहेत.
याचं दृष्टिकोनातून बेनकनहळळीत सरकारी मराठी शाळेत आधुनिकीकरण करण्यात आले आहे.या शाळेत E Lerning या आधुनिक शिक्षण प्रणालीची सुरूवात झाली आहे यासाठी गावातील आजी माजी सैनिक व माजी विद्यार्थी यांच्या मदतीने हे कार्य करण्यात आले आहे.
इ लर्निंग बनवणारी तालुक्यातील पहिली मराठी शाळा बनली आहे.प्रोजेक्ट्र च्या माध्यमातून देखील मुलांना पाठ शिकवले जाणार आहेत फलकावर न लिहिता पूर्ण बुक प्रोजेक्टर वर दाखवून अभ्यास क्रम शिकवला जाणार आहे. सध्या एक वर्ग सुरू करण्यात आला असून आगामी वर्ष भरात हळूहळू पूर्ण शाळाच हायटेक बनवण्याचा मानस या बेनकनहळळी येथील माजी विद्यार्थ्यांनी केला आहे.
ग्रामीण भागात देखील मराठी माध्यमाचे विद्यार्थी कमी होत असून इंग्लिश कडे कल वाढत आहेत अश्यात बेनकनहळळी शाळेत इ लर्निंग सुविधा करून एक मराठी मराठी वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे याचा आदर्श इतर शाळांनी का घेऊ नये?