सकुळ साळी समाज बाजार गल्ली वडगांव बेळगांव
भगवान जिव्हेश्वर उत्सव निमित्त
जिव्हेश्वर मंदिर येथे बालिका आदर्श विद्यालयाच्या मुलींनी किर्तनाचे सादरीकरण करून अवघा रंग एकची झाला असेच भक्तीमय वातावरण तयार झाले . साक्षात पंढरीचं अवतरलेली होते.
ह.भ.प.गोपाळ पाटील गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा पार पाडला. कु श्रेया विश्वनाथ सव्वाशेरी इयत्ता ९ वी हिने शानदार शैलित किर्तन सादरीकरण करून सर्वांची वाहवा मिळविली. सोनाली पाटीलने(९ वि) गायनाने मंत्रमुग्ध केले. ७वी च्या २५ मुलींनी टाळकरी म्हणून साथ दिली.
प्रारंभी समाज अध्यक्ष सुकिर्त भंडारे यांनी सर्वांचे स्वागत केले. साळी समाजा सह वडगांव भागातिल भक्तगन मोठ्या संखेने उपस्थित होते
ह ब प गोपाळ महादेव पाटील यांचा सत्कार अध्यक्षानी केला.
पंढरीसी जारे आल्यानो संसारा या अभंगावर किर्तनाचा सार होता.सुंदर ते ध्यान उभे विटेवरी,पांडुरंगा करू प्रथम वंदन,पसायदान आणि विठ्ठल नामाच्या गजरात उत्साही वातावरणात आणि बालकलाकार कु गणेश पाटील पखवाज वादनाने किर्तनाची सांगता झाली.सुकिर्त भंडारे यानी स्वागत केले तर आभार प्रदर्शन गोपाळ परशराम सपारे यांनी मानले .शाळेचे शिक्षक एकनाथ पाटील ,विजय पार्लेकर, उमेश बेळगुंदकर ,कविता चौगुले,मनिषा लाटूकर यांचे सहकार्य लाभले.
कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता स्वकुळ साळी समाज ट्रस्ट कमिटी,महीला मंडळ ,युवक मंडळ ने विशेष प्रयत्न केले.