शिक्षण व्यवसाय किंवा नोकरी अश्या कोणत्याही क्षेत्रात प्रामाणिक पणे मेहनत केल्यास यश नक्की मिळते म्हणूनच माझ्या सारख्या एक सामान्य कुटुंबातील माणूस साखर कारखाने चालवू शकतो त्यामुळे प्रामाणिक पणा सोडू नका असा सल्ला कागवाडचे आमदार श्रीमंत पाटील यांनी दिला आहे.ते बेळगावातील मराठा मंदिरात गुणी विद्यार्थ्यांच्या सत्कार कार्यक्रमात बोलत होते.
दहावीत 90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवलेल्या 92 विद्यार्थ्यांचा गौरव बेळगाव क्षत्रिय मराठा परिषदेच्या वतीनं करण्यात आला.मराठा मंदिर सभागृहात रविवारी दुपारी झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य मराठा परिषदेचे अध्यक्ष सुरेशराव साठे होते.यावेळी राणोजीराव ,आमदार अनिल बेनके,किसनराव येळ्ळूरकर,ए एम पाटील,पी एम जगताप सुधीर चव्हाण आदी उपस्थित होते.
प्रारंभी माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना मौन पाळून श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी बार असोसिएशनचे विनय मांगलेकर,रवी पाटील आणि शिवसंत संजय मोरे यांचा सत्कार करण्यात आला.
दहावी बारावी सोबत करियर परीक्षा देखील तितकीच महत्वाची आहे त्यासाठी विद्यार्थ्यांनी याकडे देखील जास्त लक्ष देणे गरजेचे आहे असे मत युनिक अकादमीचे राजकुमार पाटील यांनी व्यक्त केले.यावेळी राजेंद्र मूतगेकर यांनी देखील विचार मांडले.