केरळ मध्ये झालेल्या हाहाकारा नंतर देशभरातुन सगळीकडून मदतीचा ओघ सुरू असताना बेळगाव विमान उड्डाण प्राधिकरणाने देखील पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यासाठी विमान उड्डाण प्राधिकरणाने पुढाकार घेतला आहे.
बेळगाव विमान प्राधिकरणाने देखील केरळ साठी पुढाकार घेत आवाहन केलं असून पूर ग्रस्त पीडितांसाठी जनतेनी जीवनावश्यक वस्तू सांबरा विमान तळावर आणून द्याव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.विमान तळ संचालक राजेश कुमार मौर्य यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात बेळगावातील लोकांनी खाद्य पदार्थांसह,टॉवेल,ब्लॅंकेट,कपडे,चादर, औषधे बिस्कीट तांदूळ साखर तेल इतर जीवनावश्यक वस्तू दान करा सांबरा येथील विमान तळ टर्मिनल बिल्डिंग मध्ये आणून द्याव्यात असे आवाहन केले आहे.बेळगावातील जनतेने हलक्या बॉक्स मध्ये पॅक करून द्याव्यात जेणे करून पूरग्रस्तां पर्यंत पोचवायला मदत होईल असे पत्रकार नमूद करण्यात आले आहे.
देशातील सर्वच विमान तळावर कार्यरत कर्मचारी आपापल्या परीने या कार्यात मदतगार होणार आहेत विमान उड्डाण प्राधिकरणाचे अध्यक्ष महापात्रा यांनी काढलेल्या आदेशानुसार देशातील सर्व विमान प्राधिकरणाच्या अखत्यारीतील विमान तळावर मदत सामुग्री जमा केली जाणार आहेत.बेळगावातील विमान तळावर जमा होणारे साहित्य एअर इंडिया आणि अलायन्स एअर वेज च्या माध्यमातून बंगळुरूला पाठवण्यात येणार असून तेथून त्या वस्तू कोची नौदलाच्या विमानाने केरळ पूरग्रस्तांना सुपूर्द केल्या जाणार आहेत.
मदत सामुग्रीच्या अधिक माहितीसाठी शिवाजी भडांगे 9620303005, बी जी रेड्डी 8050188188,सुरेश नावी9945948748, सुभाष पाटील 8095917111 यांना संपर्क करा असे आवाहन करण्यात आले आहे.