पिरनवाडी ते झाडशहापुर हा राष्ट्रीयमार्ग 4 अ मध्ये मोडणाऱ्या रस्त्याच्या दुर्दशे विराधात मच्छे ग्रामस्थ आणि युवकांनी आंदोलन छेडून रास्ता रोको आंदोलन केले होते.
मच्छे यूथ चॅलेंजर्स आणि ग्रामस्थांच्या वतीनं स्वामी नगर कॉर्नरवर पुकारलेल्या या रास्ता रोको आंदोलनात शेकडो युवकांनी सहभाग दर्शवला होता. सकाळी दहा वाजता तब्बल अर्धा तास वाहने अडवून शासनाचा निषेध नोंदवण्यात आला.
पिरनवाडी ते झाडशहापुर रोड वर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालं असून अपघात अनेक युवकांचे बळी गेले आहेत त्यामुळे शासन आणखी किती बळी घेणारअसा प्रश्न आंदोलक युवकांनी केला आहे.आगामी दिवसात रस्त्याची डागडुजी करण्यात आली नाही तर मोठं आंदोलन हाती घेऊ असा इशारा देखील ग्रामीण पोलीस उपनिरीक्षकाना दिलेल्या निवेदनातून दिला आहे.मच्छे सह पिरनवाडी,झाड शहापूर येथील युवक देखील आंदोलनात सहभागी झाले होते.
सार्वजनिक बांधकाम खाते आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी याकडे लक्ष देतील का हा मुख्यतः सर्वांत मोठा प्रश्न आहे बेळगाव गोव्याकडे खानापूर हलियाळ कडे जाणाऱ्या वाहनांना या खड्ड्यांचा फटका असत आहे अनेकदा मीडियाने देखील आवाज उठवला तरी देखील प्रशासन जागे होताना दिसत नाही त्यामुळं संतप्त युवकांनी रस्ता अडवून शासनाचा निषेध केला.