चालकाचा बस वरील ताबा सुटल्याने व्ही आर एल ची आराम बस पलटी झाल्याची घटना शनिवारी सकाळी साडे सहाच्या दरम्यान घडली आहे.
पुणे बंगळुरू राष्ट्रीय महा मार्गावर हलगा सुवर्ण सौध जवळील टोयोटा शो रूम जवळ हा अपघात घडला असून या घटनेत चालका सह सहा जण जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बंगळुरू हुन पुण्या कडे जाणारी आराम बस पहाटे साडे सहाच्या दरम्यान पलटी झाली बस चालकाचा वाहना वरील ताबा सुटल्याने बस सर्व्हिस रोड वरील चरित पलटी झाली.हा अपघात सुदैवाने उड्डाण पुलावर झाला नाही अन्यथा मोठे नुकसान झाले असते.
जखमी चालकांवर विजया हॉस्पिटल तर इतर पाच जणांवर सरकारी इस्पितळात उपचार सुरू आहेत.हिरेबागेवाडी पोलिसात गुन्हा नोंद झाला असून पोलिस निरीक्षण एस सी पाटील अधिक तपास करत आहेत.