भारत रत्न माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी शुक्रवारी दुपारी शोक सभेचे आयोजन करण्यात आले होते. व्यासपीठावर खासदार सुरेश अंगडी,खासदार प्रभाकर कोरे, राजेंद्र हरकुनी, एम बी जिरली,उज्वला बडवणाचे आदी उपस्थित होते.
यावेळी शोक सभेचे वातावरण गांभीर्यमय होते ज्यावेळी खासदार सुरेश अंगडी श्रद्धांजली भाषण करत होते त्यावेळी भाजपच्या एका महिला पदाधिकारी मात्र स्वतःच सेल्फी वेगवेगळ्या अँगलने घेण्यात मग्न होती.सदर महिला पदाधिकारी सेल्फी घेत असलेले छायाचित्र तिथे उपस्थित काही फोटो ग्राफरनी काढल्या नंतर त्यानाही दमदाटी करण्याचा प्रयत्न झाला.
स्वतःला पार्टी विथ द डिफ्रन्स शिस्तबद्ध पक्ष म्हणून मिरवणाऱ्या पक्षात शोक सभेवेळी महिला पदाधिकाऱ्या कडून सेल्फी घेणे हे पक्षाच्या तत्वाला तिलांजली देणारे आहे त्यापेक्षा उलट छाया चित्रकारांना दमदाटी करणे लोकशाही विरोधी असल्याची संतप्त प्रतिक्रिया याठिकाणी ऐकायला मिळत होती.
अजातशत्रू, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या बद्दल केवळ भाजपच नव्हे तर संपूर्ण विरोधी पक्ष आणि देश विदेशात आदराची भावना आहे अश्या व्यक्तीच्या श्रद्धांजली सभेत सेल्फी काढण्याची नौटँकी करणाऱ्या शो बाज महिला भाजप पदाधिकाऱ्याची मस्ती उतरवतील का हा प्रश्न देखील भाजपच्या अंतर्गत गोटात उपस्थित होताना दिसत आहे.
एकिकडे श्रद्धांजली सभा नियोजित वेळेत सुरू होऊ शकली नाही तर दुसरीकडे महिला पदाधिकाऱ्यांच्या या वर्तना मूळ सभेचे गांभीर्य नव्हते याची देखील चर्चा होती.सदर सेल्फीचा फ़ोटो सगळीकडे सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.