गेल्या कित्येक महिन्यापासून आपल्या घरात वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या एका दाम्पत्यास शहर गुन्हा अन्वेषण आणि कॅम्प पोलिसांनी अटक केले आहे.
शहरातील विजय नगर भागात एका भाड्याच्या घरात हे दोघे पती पत्नी वेश्या व्यवसाय चालवत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी छापा टाकून दांपत्य गजाआड केले आहे.नेसरगी येथील शीला तिपन्नवर आणि गोकाक येथील बाळय्या हिरेमठ अशी या दोघांची नावे आहेत.
सी सी बी पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे कॅम्प पोलिसात गुन्ह्याची नोंद झाली आहे.