www.belgaum.nic.in किंव्हा www.belgavi.nic.in या नावाने ओळखल्या जाणाऱ्या बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या नव्या वेबसाईटचे उद्घाटन आज स्वातंत्र्यदिनी झाले.
जिल्हाधिकारी झियाउल्ला एस यांनी हे उद्घाटन केले. अप्पर जिल्हाधिकारी डॉ बुडेप्पा एच बी, जिल्हा माहिती अधिकारी संजीव क्षीरसागर व इतर अधिकारी उपस्थित होते. सहाय्यक माहिती अधिकारी शिरीष कडगडकाई यांनी या वेबसाईटची माहिती दिली.
जीआयजीडब्ल्यू चे सगळे नियम ही वेबसाईट पालन करेल. ती अतिशय सुरक्षित आहे. कन्नड आणि इंग्रजी आशा दोन भाषेत या वेबसाईटवर माहिती मिळेल. जिल्ह्याशी संबंधीत सर्व माहिती मिळणार आहे. तसेच सूचना, तक्रारी लिहिता येणार आहेत.
पोलीस आयुक्त कार्यालयातील पासपोर्ट सेवा केंद्र विभागाचे उदघाटन करण्यात आले.जिल्हाधिकारी एस जिया उल्ला यांनी फीत कापून याचं उदघाटन केलं.
नेहरू स्टेडियम आणि सुवर्ण सौध येथील ध्वजारोहन झाल्यावर हा कार्यक्रम झाला.यावेळी पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांच्या सह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.