Saturday, January 11, 2025

/

विमानतळावर ‘फडकला १०० फुटी राष्ट्रध्वज’

 belgaum

सांबरा विमानतळावर आज स्वातंत्र्यदिन साजरा करण्यात आला. विमानतळ टर्मिनल बिल्डिंग आवारात १०० फुटी राष्ट्रध्वज फडकवण्यात आला.

विमान उड्डाण प्राधिकरणाच्या वतीनं नव्याने बनवण्यात आलेल्या 30 मीटर उंच तिरंगा ध्वजाला केशरी पांढऱ्या आणि हिरव्या पाण्यात अनोखे वाटर सॅल्युट देण्यात आले त्या नंतर ध्वजारोहण करण्यात आले.

Airport flag

खासदार सुरेश अंगडी प्रमुख पाहुणे होते. आमदार लक्ष्मी हेबाळकर, के एल एस चे चेअरमन एम आर कुलकर्णी, विजयकांत डेअरी चे एमडी शशिकांत सिदनाळ, सांबारा एटीएस चे ग्रुप कॅप्टन एस के शर्मा, एकस चे प्रसिद्धी विभाग प्रमुख बसवराज सुगंधी हे मान्यवर उपस्थित होते.

 

यावेळी शालेय विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केलेएमबीएस स्कुल सांबरा, जनता हायस्कुल बाळेकुंद्री, शेख सेंट्रल स्कुल चे विध्यार्थी उपस्थित होते.सांस्कृतिक कार्यक्रम आणि मान्यवरांची भाषणे झाली.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.