तिलारीच्या नदीत बुडत असलेल्या तरुणींना वाचविण्याचे धाडस दाखवणाऱ्या कुद्रेमनी गावच्या दी रियल हिरोचा आज स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने बेळगाव जिल्हा प्रशासनाने सत्कार केला आहे.
कुद्रेमनी गावचा मनोज धामणेकर हा तरुण आपले धाडस आणि मदतीच्या भावनेने हिरो ठरला आहे. बेळगाव live ने सर्वात प्रथम त्याचे हे धाडस जनतेसमोर दाखवले. आणि त्याने तरुणींचा जीव वाचविल्याची माहिती सगळ्यांना समजली.
ग्रामीण आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी आणि चंदगड तालुका तहसीलदार आणि शासकीय अधिकाऱ्यांनी त्याचा सर्वात प्रथम सत्कार केला, त्यानंतर विविध संघ संस्थांनी त्याचा सत्कार केला होता. आज जिल्हा प्रशासनाच्या ध्वजवंदन कार्यक्रमात त्याचा सत्कार करण्यात आला असून त्याच्या धाडसाचे कौतुकही करण्यात आले आहे. यावेळी पालकमंत्री रमेश जारकीहोळी, खासदार सुरेश अंगडी,महापौर बसप्पा चिखलदिनी,जिल्हाधिकारी एस जिया उल्ला,जिल्हा पंचायत सी इ ओ रामचंद्र राव, पालिका आयुक्त शशिधर कुरेर, ए सी कविता योगपणावर आदी उपस्थित होते.
मनोज याच्या धाडसाबद्दल माहिती राष्ट्रपती कार्यालयास देऊन त्याला राष्ट्रपती शॉर्या पदक मिळवून देण्याची गरज आहे. या साठी बेळगाव जिल्हा प्रशासना कडून प्रयत्न झाले पाहिजेत.पुन्हा एकदा स्वतःचा जीव धोक्यात टाकून दोन मुलींचे जीव वाचवणाऱ्या रियल हिरोचं कौतुक…