अनगोळ येथील स्मशान शेडची दुरुस्ती आणि इतर कामांकरिता नगरसेवक विनायक गुंजटकर यांनी उपसलेलं आंदोलनाच्या हत्त्यारा नंतर या कामाला सुरुवात करण्यासाठी पंधरा दिवसांच अवधी घेऊन आश्वासन देण्यात आलंय तर पडक्या शेडची गळती असलेले पत्रे काढण्यात आले .
नगरसेवक अनिल मुचंडीकर यांच्यासह अनगोळ येथील पंच मंडळींनी मंगळवारी सकाळी 11 ते दुपारी तीन या वेळेत स्मशानभूमीत ठाण मांडून ठिय्या आंदोलन केले होते उपमहापौर मधूश्री पुजारी यांनी स्मशानभूमीत भेट देऊन पंधरा दिवसात शेड दुरुसती करून नवीन पथदीप बसवू असे आश्वासन दिलंय.
पालिका अधिकारी मुत्तेमनावर यांनी अनगोळ स्मशानभूमी साठी एकूण 18 लाखांचे इस्टीमेट करण्यात आले असून केवळ शेड साठी 5 लाख खर्च करणार अशी माहिती दिली त्यावर गुंजटकर यांनी 18 लाख मंजुरी करिता अवधी लागेल त्यामुळं इतर स्मशान मध्ये कसे अगोदर काम पूर्ण होते मग टेंडर प्रोसेस करतात तसं पाच लाखांचे काम करा अशी सूचना केली.त्यावर पथदीप इतर सुविधा शेड चे काम 15 दिवसात करण्याचे आश्वासन देण्यात आले.