कळसा भांडुरा पाणी वाटपात कर्नाटकाला पिण्यासाठी 5.5 टी एम सी पाणी मिळणार आहे. तर विद्युतनिर्मितीसाठी 8.02 टी एम सी पाणी मिळणार आहे.कर्नाटकला लवादाच्या आदेशानुसार एकूण 13.02 टी एम सी पाणी मिळणार आहे.
म्हादाई वाटर डिसप्युट ट्रिब्युनल ने 35 टी एम सी पाणी देण्याची कर्नाटकाचा मोठी जल लवादाने फेटाळात एक प्रकारे पुन्हा एकदा गोव्याची बाजू धरली आहे.
मंगळवारी दिल्लीत जल लवादाने निकाल दिला संबंधित खात्याच्या परवानगी शिवाय कोणत्याही प्रकारचे पाण्याची दिशा वळवू नये असा आदेश देखील दिला आहे.
कळसा भांडुरा योजनेचा नवीन डी पी आर तयार केल्या शिवाय पुढील कोणतेही काम करू नये अशी देखील जल लवादाने म्हटलं आहे.पुढील निकाल येईपर्यंत 17.4.2015 चा निकाल असाच राहिल संबंधीत खात्याची परवानगी घेऊन पुढचे काम करावे असेही लवादाने म्हटले आहे.
35 टी एम सी पाणी मागण्यात आलं होतं पिण्यासाठी म्हणून पाच टी एम सी पाणी कर्नाटकला मिळणार आहे कावेरी पाणी वाटपात तमिळनाडू ला पाणी सोडा असा निकाल आहे त्यानंतर म्हादाई पाणी वाटपाच्या निवाड्यात पिछेहाट झाली आहे