बेळगाव जिल्ह्याला देखील मोठा इतिहास आहे अनेक पुरातन जुन्या ब्रिटिश काळातील घरे इथे पहायला मिळतात बेळगाव जिल्ह्यात असं एक घर आहे त्या एका घराला एक नाही दोन नाही तर तब्बल 101 दरवाजे खिडक्या आणि खोल्या आहेत.
बैलहोंगल तालुक्यातील इटगी या गावाजवळील तुरमुरी या गावात हा वाडा आहे की ज्याला 101 दरवाजे खोल्या आणि खिडक्या तब्बल चार जिने आहेत.मिळालेल्या माहितीनुसार कित्तुर चे राजे मल्लसर्ज आणि राणी चन्नम्मा यांनी हा वाडा बांधला होता. तुरमुरी गावच्या अक्कम्मा यांना तो बक्षीस स्वरूपात भेट म्हणून दिला होता. याच अक्कम्मा यांचे वंशज याच घरात आज देखील राहतात.
एकूण चार एकर जमिनीत हा वाडा असून एकेकाळी अक्कमा यांच्या परिवाराने कित्तुर राणी चनममा यांचे पती राजे मलसर्ज यांना झाडामध्ये वांगी भाकरी शिजवून खायला दिली होती त्यांना ती आवडलीहोती त्यावेळी राजांनी खुश होऊन त्यांना हा वाडा बक्षीस म्हणून भेट दिला होता.
पुर्वी हा बैलहोंगल तालुका होते आता हा कित्तुर तालुका म्हणुन ओळखला जातो.सौदत्ति यल्लम्मा देवी ला जाताना हा वाढा पाहुन बैलहोंगल येथे राणी चन्नम्मा समाधीस्थळ पाहु शकता. सौदत्ती ला जाण्या करीता ईटगी ,तुरमरीजवळ चा बायपास मार्ग १५ ते २० km अंतर कमी होते.
विश्वनाथ सव्व्वाशेरी