अनगोळ स्मशान भुमित नगरसेवक विनायक गुंजटकर, यांच्या उपोषण आंदोलनाला सुरुवात झालोआहे
अनगोळ येथील स्मशान भुमितील समस्या सोडवण्यासाठी वारंवार मागणी करूनही त्या सोडवण्यात येत नाहीत. मागील दोन महिन्यांपूर्वी उप महापौर मधुश्री पुजारी यांनी अधिकाऱ्यांसह अनगोळ स्मशान भुमीला भेट देऊन तेथील समस्या जाणून घेतल्या होत्या. व त्या ताबोडतोब सोडवण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या होत्या.
पण अद्याप एकाही अधिकाऱ्यांनी या कडे लक्ष दिले नाही. गावातील नागरिक सतत नगरसेवकांना या बद्दल जाब विचारत आहेत. पण नगरसेवकांना अधिकारी फक्त आश्वासन देऊन त्यांची बोळवण करत आहेत.
परवाच्या सभेवेळी नगरसेवक विनायक गुंजटकर यानी महापौर आणि आयुक्तांना या संबंधी निवेदन दिले होते दोन दिवसात जर कामाला सुरुवात केली नाही तर. येत्या मंगळवारी सकाळी ठिक 11:00 वाजता अनगोळ स्मशान भुमित उपोषणाला बसणार असे जाहीर केले होते. तरीही अधिकाऱ्यांनी महापौरांनी, आयुक्तांनी गुंजटकरांच्या या निवेदनाला वाटाण्याच्या अक्षता लावल्या. आणि आज गुंजटकर हे आपल्या सहकाऱ्यांसह स्मशान भुमितील गेट जवळ उपोषणाला बसले आहेत…