18 व्या आशिया क्रीडा महोत्सवातील महा संग्रामात बेळगावची कन्या मलप्रभा जाधव हिची निवड झाली आहे.सदर स्पर्धा आगष्ट महिन्यात इंडोनेशिया येथील जकार्ता येथे होणार आहे. ज्यूडो मधल्या कुरास या प्रकारात 52 किलो वजन गटात ती खेळणार आहे.
भारत सरकारने आशियाई स्पर्धेसाठी 517 खेळाडूंची सूची क्रीडा मंत्रालयाने जाहीर केली आहे त्यात मलप्रभाचे नाव समाविष्ट आहे.
मलप्रभा हिने यापूर्वी झालेल्या इनडोअर एशियन गेम्स मध्ये सिल्वर मेडल घेऊन किरगिस्थान या परक्या देशात आपली छाप पाडली होती.पुणे मध्ये झालेल्या एशियन चॅम्पियनशीप स्पर्धेत ब्रॉन्झ पदक तिने मिळवले असून तब्बलचारवेळा राष्ट्रीय स्पर्धा जिंकली आहे. यात दोन गोल्ड, एक सिव्हर, एक ब्रॉन्झ मेडल चा समावेश आहे. भारत सरकारने तिच्या या योगदानाची दखल घेऊन तिला एकलव्य पुरस्कार प्रदान केला आहे.
१९ वर्षीय मलप्रभा हिला जितेंद्र सिंग या ज्यूडो प्रशिक्षकां चे मार्गदर्शन मिळत आहे.१८ ऑगस्ट ते २ सप्टेंबर अशी तिची स्पर्धा होईल तर त्यासाठीउझबेकिस्थान मध्ये २ ते १९ ऑगस्ट पर्यंत विशेष प्रशिक्षण पूर्ण होणार आहे.