मोठा गाजावाजा करून बेळगाव येथील किल्ला तलावाच्या परिसरात जगातील सर्वात मोठा ध्वज उभा करण्यात आला. मात्र त्या राष्ट्र ध्वजाचा वारंवार अपमान होत असून मात्र त्याचे गांभीर्य नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी बुधवार दि 15 रोजी स्वातंत्र्य दिन आहे. मात्र या दिवशीही हा ध्वज फडकविण्यासाठी प्रशासन गुंतल्याचे दिसून येत आहे.
बेळगावात सर्वात मोठा तिरंगा फडकविण्यात आला मात्र विविध समस्यांनी हा ध्वज फडकविण्यात अडथळे निर्माण झाले आहेत. ध्वजाची लांबी, रूंदी, खांबांची उंची आशा वेगवेगळ्या कारणांनी व्यत्यय निर्माण होत गेले.त्यामुळे बुधवारी ध्वज फडकविण्यासाठीचया तयारीत प्रशासन गुंतल्याचे दिसून येत आहे.
हा ध्वज उभे करण्यासाठी 62 लाखांचा निधी खर्च आला आहे.मात्र हा ध्वज उभे करण्यासाठीचे प्रयत्न फोल ठरत आहेत. एकीकडे देश भक्ती अन दुसरीकडे ध्वजाचा अवमान. याचा विचार प्रत्येक अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी करण्याची गरज आहे.
वारंवार राष्ट्र ध्वजाचा होणारा अवमान हा राष्ट्र प्रेमींच्या जिव्हारी लागत आहे. भारतीय संस्कृती आणि त्यांची जोपासना जारण्याची जबाबदारी ही प्रत्येक नागरीकाची आहे. म्हणून प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करून राष्ट्र ध्वजाचा अवमान करणे थांबविणे ही काळाची गरज बनली आहे