‘मराठी साहित्यात नवनवे प्रवाह दिसून येतात जरी आपण पूर्वीच्या ठराविक साहित्यिकांच्या साहित्याला कवटाळून बसलो असलो तरीही आज जे नवनवीन लेखक लिहीत आहेत त्यांच्या साहित्याचे वाचन होत नाही’ अशी खंत मनस्विनी लता रवींद्र यांनी व्यक्त केली
सार्वजनिक वाचनालय बेळगाव च्या वतीने दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार यंदा सुप्रसिद्ध नाट्यलेखिका व दिगदर्शिका श्रीमती मनस्विनी लता रवींद्र यांना बहाल करण्यात आला त्याप्रसंगी त्या बोलत होत्या
सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराचे स्वरुप 25 हजार रुपये रोख ,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे वाचनालयाच्या अध्यक्षा सुनीता मोहिते यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला
आपल्याला पुरस्कार मिळाल्याबद्दल कृतद्न्यता व्यक्त करून मनस्विनी लता रवींद्र पुढे म्हणालल्या की’ पूर्वी फक्त लिखित साहित्य वाचावयास मिळे आता टीव्ही मोबाइल ,व्हाट्सएप यांच्या माध्यमातून साहित्याचा प्रचंड स्त्रोत उपलब्ध आहे .अशा परिस्थितीत प्रायोगिक नाटकात बराच बदल झाला असून व्यावसायिक नाटकात मात्र तो बदल झालेला दिसत नाही .आजची सामाजिक व राजकीय स्थिती भयावह असूनही साहित्यिक, नाटककार हे समाजाबद्दलची आपली जबाबदारी पार पडत आहेत असेही त्या म्हणाल्या
कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकसभेचे माजी सभापती सोमनाथ चटर्जी व नोबेल पारितोषिक प्राप्त साहित्यीक व्ही एस नायपाल यांच्या निधनाबद्दल दुखवटा व्यक्त करून शब्दांजली वाहण्यात आली .मनस्विनी लता रवींद्र यांच्या हस्ते आचार्य अत्रे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला .कार्यवाह नागेश सातेरी यांनी प्रास्ताविक व स्वागत केले तर नेताजी जाधव यांनी आभार मानले वाचनालयाचे उपाध्यक्ष कृष्णा शहापूरकर यांनी सूत्रसंचालन केले वाङ्मय चर्चा मंडळाच्या सभागृहात संपन्न झालेल्या या कार्यक्रमास विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते