युवक सक्षम झाल्यास काहीही होऊ शकतं देशाचा युवक सदृढ राहिला पाहिजे म्हणून युवक आणि विद्यार्थ्यांत अंमली पदार्थ ड्रग्स सेवन विरोधी जनजागृती मोहिमचं हाती घेऊन जनजागृतीचा धडाका पोलीस आयुक्त डी सी राजप्पा यांनी लावलाय.दररोज युवक आणि विद्यार्थ्यांत जाऊन ते अंमली पदार्थ सेवन विरोधी कार्यक्रम हाती घेऊन व्याख्याने देताहेत जणूं काही त्यांनी बेळगावचे नो ड्रग्स मिशनच हाती घेतलेतअसंच त्यांचं कार्य सुरू आहे.
शहापूर पोलीस स्थानक कार्यक्षेत्रातील चिंतामण हायस्कुल मधील पाचशेहून अधिक विद्यार्थ्यांसाठी तर जे एन एम सी मेडिकल कॉलेजच्या दोन हजार विद्यार्थ्यांना त्यांनी एकाच दिवशी व्याख्यान दिल.पोलीस आयुक्त स्वतः एक कवी असल्याने भाषणातून विचार पटवून देणे त्यांच्यासाठी सोपं काम आहे.कोवळ्या वयात नशेच्या आहारी विद्यार्थी युवकांनी जाऊ नये , याच वयात मनुष्य जीवनाचा टर्निंग पॉईंट असतो त्यामुळे तुम्ही मित्र निवडताना देखील तारेवरची कसरत करा.आई वडिलांच्या इच्छा अपेक्षांकडे लक्ष द्या. यासाठी तुम्ही ड्रग्स अंमली पदार्थांचे सेवन करू नका. असा संदेश त्यांनी दिला.मार्केट ए सी पी शंकर मारिहाळ, शहापूर पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी देखील कार्यक्रमात सहभागी होते.
काल रविवारी त्यांनी याच कामासाठी आरोहण मॅरेथॉन दौड आयोजित केली होती. त्याला देखील चांगला प्रतिसाद मिळाला होता. तसं पाहिल्यास सातच्या आत शहरातील उद्याने बंद असा आदेश काढून त्यांना गप्प बसता आलं असत मात्र ड्रग्स विरोधी मोहिमेत ते शहरभर फिरताहेत, शाळा कॉलेज मध्ये व्याख्याने देताहेत. हे बेळगावच्या भविष्यासाठी नक्कीच चांगले पाऊल आहे.
अशा वेगळी वाट शोधून तरूणाईला वाम मार्गापासून वाचवण्यासाठी धडपडणाऱ्या अधिकाऱ्याच बेळगावकरातून कौतुक होत आहे.