बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालय आवारात असलेल्या प्रादेशिक आयुक्त कार्यालयासमोरील लाल पिवळ्या ध्वजा संदर्भात गांधीनगर मधील युवा कार्यकर्ते सूरज कणबरकर याने आता थेट सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र लिहिले आहे.
हा लाल पिवळा ध्वज अनधिकृत आहे. तरीही तो फडकविला जातोय आणि विशेषतः भारताच्या तिरंगा ध्वजापेक्षा उंच असा तो लावला जात आहे, भारतीय ध्वज संहितेचा यामुळे अवमान होत आहे.
बेळगावमध्ये स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताकदिनी असे प्रकार करीन तिरंगा ध्वजाचा अपमान करत आहेत. यंदाही स्वातंत्र्यदिनी राष्ट्रीय ध्वजाचा असाच अपमान होण्याची शक्यता आहे, तरी आपण लक्ष घालून हा अपमान थांबवा अशी मागणी त्याने केली आहे.
या स्वातंत्र्यदिनी तरी लाल पिवळा काढा जेणे करून राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही असे पत्र प्रादेशिक आयुक्तांना दिले आहे.राष्ट्रीय ध्वज नीती संहिते प्रमाणे आजू बाजूला कोणताही दुसरा ध्वज असल्यास तो उतरवल्या शिवाय राष्ट्र ध्वज चढवू नये असे आहे मात्र प्रादेशिक आयुक्त आणि जिल्हाधिकारी काय करतात हे पहा असेही सूरज कणबरकर यांनी म्हटले आहे.