लोकशाहीत तिरंग्याचा अपमानांच्या घटना थांबवणे गरजेचे असून स्वातंत्र्यदिनाच्या निमित्त प्लास्टिक ध्वजावर पूर्णपणे बंदी घाला अशी मागणी हिंदू जनजागरण समितीच्या वतीनं करण्यात आली आहे.सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालया समोर हिंदू जनजागरण समितीच्या कार्यकर्त्यांनी निदर्शन करून ही मागणी केली.
स्वातंत्र्यदिनी आपण सर्वजण देशभक्ती भावना दाखवत गाणी म्हणत असतो मात्र ध्वजा रोहनच्या काही तासांतच लहान लहान प्लास्टिक ध्वज पायात पडत असतात त्यामुळं तिरंग्याचा अनेक ठिकाणी अपमान होत असतो यासाठी प्लास्टिक ध्वजा वरच बंदी घाला अशी मागणी जण जागरण समितीने केली आहे.
राष्ट्र गौरव आणि राष्ट्र हितार्थ अनेक महापुरुषांनी बलिदान दिलंय मात्र अश्या प्रकारे राष्ट्र ध्वजाचा अपमान करून स्वातंत्र्य लढ्यात देशासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचा अपमान करत आहोत म्हणून या वर्षीचा स्वातंत्र्य दिन प्लास्टिक ध्वज विरहित करा असे देखील जनजागरण समितीने दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे.यावेळी हिंदू जनजागरण समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.