पोलीस कर्मचाऱ्यांच्या आरोग्य सुधारणा आणि अमली पदार्थ विरोधी जनजागृती म्हणून एम स्क्वेयर नेटवर्क संस्था बंगळुरू यांच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या आरोहण दौडीस बेळगावात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.शहरातील सी पी एड मैदानावर या दौडीची सुरुवात झाली.उत्तर विभाग आय जी पी अलोककुमार ,पोलीस आयुक्त डी सी राजप्पा उपायुक्त सीमा लाटकर यांनी या दौडीस चालना दिली.
मराठा सेंटरच्या आकर्षक बँड वादनाने या मॅरेथॉन दौडीत पोलीस अधिकाऱ्यांसह,मराठा सेंटरचे जवान, अनेक शाळा कॉलेजचे विद्यार्थी, सामाजिक संस्थांचे पदाधिकारी रोटरीच्या सदस्यांनी सहभाग घेतला होता.’aarohn run our police run say to no drugs’ अश्या आशयाचे फलक लावण्यात आले होते.सी पी एड मैदानातून पाच आणि दहा की मी दौड आयोजित करण्यात आली होती.आरोहण संस्थेच्या मनीषा भट्ट यांनी शानदार नृत्य सादर करून सर्वांचं लक्ष वेधून घेतलं.
सी पी एड मैदान,विनायक मंदिर,हनुमान नगर चौक पासून पुन्हा सी पी एड मध्ये समारोप करण्यात आला हजारो बेळगावकर जनतेने यात सहभाग घेतला होता.ए सी पी शंकर मारिहाळ,पोलीस निरीक्षक जावेद मुशाफिरी, रमेश गोकाक,निरंजन पाटील,जे एम कालीमिर्ची,बी आर गड्डेकर आदीनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेतील विजेते खालील प्रमाणे
5 की मी दौड
प्रथम-एस के यादव
द्वितीय-एम एस नदाल
तृतीय-एम के भिशोनय
चौथा-मंजुनाथ जर्सी
पाचवा-नायक नितीन जाधव
10 की मी दौड
प्रथम-वेंकप्पा धुळीन
द्वितीय-सिद्धप्प मॅगेरी
तृतीय-सिद्धार्थ दिवाकर
चौथा-वेणूगोपाल
पाचवा-गोविंद जोशी
पोलीस अधिकारी शहर
प्रथम-निरंजन पाटील उद्यमबाग पोलीस निरीक्षक
द्वितीय-विजय शिंनूर, मारिहाळ पोलीस निरीक्षक
तृतीय-बी आर गडेडकर